इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले

  • डॉल्फिन आणि पाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या इकथ्योसोर या ज्युरासिक कालीन प्राण्याचे अवशेष गुजरातमधील कच्छमध्ये सापडले
  • भारतात इकथ्योसोरचे अवशेष सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • इकथ्योसोर या ग्रीक संज्ञेचा अर्थ मासा-पाल (फिश-लिझर्ड) असा होतो.
  • हे अवशेष 152 दशलक्ष वर्षांपुर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
  • हे इकथ्योसोर डायनॉसोरच्या काळात पृथ्वीतलावर होते.
  • त्याचे अनेक फॉसिल्स उत्तर अमेरिका आणि युरोपात सापडले होते.
  • तसेच दक्षिण गोलार्धात ते केवळ दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सापडले होते.
    कच्छमध्ये सापडलेला सांगाडा साधारणतः 5.5 मी लांब असून तो ऑप्थल्मॉसोरिड फॅमिलीतील आहे.
  • या फॅमिलीतील प्राणी 165 ते 90 दशलक्ष वर्षांपुर्वी अस्तित्वात होते.
Please follow and like us:
0
Like

Add a Comment

English English Hindi Hindi Marathi Marathi